Sant Dnyaneshwar and Sant Tukaram sakal
पिंपरी-चिंचवड

Palkhi Sohala : पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करा! महापालिका आयुक्‍त शेखर सिंह यांच्‍या सूचना

आषाढी वारी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शहरात आगमन होत आहे. यावेळी विविध सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घ्या.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आषाढी वारी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शहरात आगमन होत आहे. यावेळी विविध सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घ्या. इतर आस्थापनांसोबत समन्वय साधून उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

तसेच सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि आराखडा तयार करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही आयुक्‍तांनी दिल्या.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळा २०२४ च्या नियोजनासाठी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्‍त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी आयुक्‍तांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्‍या.

महापालिकेच्‍या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उपआयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विठ्ठल मंदिर आकुर्डीचे विश्वस्त गुलाब कुटे, प्रमोद कुटे, माऊली आढाव, राजू ढोरे आदींसह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्‍थित होते.

पोलिस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांनी पालखी दरम्यान योग्य बंदोबस्त आणि उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले. तसेच स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येईल आणि सुरक्षेच्या बाबतीत वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

दोन्ही पालखीच्या प्रस्थानाच्या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्याबाबत सूचना देण्यात येतील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे वाहतूक पोलिस विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच अन्न व औषध प्रशासन प्रतिनिधींनी पालखी दरम्यान योग्य ती दक्षता व व्यवस्था करण्यात येणार आहे. संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे यांनी आभार मानले.

विश्वस्तांच्या महत्त्वाच्या सूचना

  • रस्त्यातील अतिक्रमणे दूर करावीत

  • पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी

  • पालखी मार्गामधील लटकलेल्या विजेच्या तारा हटविण्यात याव्यात

  • सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी

  • मोकाट जनावरे तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

  • स्वागत कमानीवरील रंगरंगोटी व दिव्यांची दुरुस्ती करावी

  • स्नान पाण्याचे नियोजन करावे

  • विसाव्यासाठी खासगी शाळा आणि मंगल कार्यालये खुली करावीत

  • वारकऱ्यांच्या अभंगांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून इतर स्पीकर आवाज कमी ठेवा

  • हरितवारीसारखे आणखी उपक्रम राबवावेत

  • जास्तीत जास्त देशी झाडांच्या बियांचे आणि रोपांचे वाटप करावे

आषाढी वारी २०२४ च्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विसाव्याच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर वारकऱ्यांना विविध सोयीसुविधा पुरविण्यात येणार असून स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच ही वारी पर्यावरणपूरक, प्लॅस्टिकमुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सैन्यदलासोबत मिळून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असून दोन लाखांपेक्षा जास्त देशी रोपांचे तसेच बाबूंच्या रोपांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT