Sant Tukaram Maharaj Palkhi sohala Sakal
पिंपरी-चिंचवड

Sant Tukaram Maharaj Palkhi : इंद्रायणी नदीचा काठ फुलला! संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान

देहूत राज्यभरातून अनेक वारकरी दिंड्या दाखल.

सकाळ वृत्तसेवा

देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता.२८) दुपारी दोन वाजता देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यानिमित्त मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

टाळ मृदुंग आणि विठुनामाच्या नामघोषात राज्याच्या कानाकोपऱ्यातून गुरुवारी (ता.२७) अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलला असून पावसाने किरकोळ हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पंढरीतील सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल झाले आहेत. मुख्य देऊळवाड्यात पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली. देहू नगरपंचायत प्रशासनाने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून तयारी पूर्ण केली आहे.

पालखी मार्गावर देहू ते देहूरोड दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या वतीने भाविकांसाठी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच शनी मंदिराजवळील पहिल्या विसावा ठिकाणी मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे.

राज्याच्या विविध भागांतून मानकरी, सेवेकरीही दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला पॅालिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व, रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी गावात दाखल झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले.

प्रसाद आणि वारीतील किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे दहा टॅंकर देहूत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नगरपंचायत प्रशासनाकडून चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, इस्कॅान यांच्याकडून भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांना मदत करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी केली आहे.

नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने निर्मल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी देहूत १ हजार १०० स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पाचशे पोलिस कर्मचारी नेण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Violence: निकालानंतर कोलकात्यात थरार! टीएमसी कार्यालयावर बुलडोझर, रस्त्यांवर भीषण गोंधळ; VIDEO व्हायरल

Summer Breakfast Recipes: थंडाव्याचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल फ्रेश पुदिना पराठा

Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाचा माेठा निर्णय! राज्यात २४ आश्रमशाळांना श्रेणीवाढ, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार..

Nira Canal Accident: नीरा कालव्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचवताना दोघे कालव्यात वाहून गेले, एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता, पोहता न आल्याने घात!

६५ वर्षांत २० मुख्यमंत्री बदलले, त्यातील फडणवीस यांनी सोलापूरच्या तरुणांना दिले ‘हे’ गिफ्ट; गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदा सुरु होणार ३ अभ्यासक्रम

SCROLL FOR NEXT