School Nutrition Food
School Nutrition Food sakal
पिंपरी-चिंचवड

School Nutrition Food : शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळेना अंडी ना केळी

प्रशांत पाटील, सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शालेय पोषण आहारात आता अंडी व केळी अशा पूरक आहाराचा समावेश केला आहे. त्यासाठी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांचा खर्च करावा, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, सध्या साडेसहा ते सात रुपयांपेक्षा कमी किंमतीत अंडे मिळत नाही. गावरान अंड्याची किंमत दहा रुपयांपर्यंत आहे.

परिणामी, तीन महिने उलटून पोषण आहारात अद्याप अंडी विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत; तर दुसरीकडे अनेक शाळांना केळी एकदाच दिल्याचे चित्र पहायला मिळाले. एकूणच शहरातील अनेक शाळांमध्‍ये शालेय पोषण आहाराचे वितरण ‘कागदावरच’ होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात महापालिका आणि अनुदानित अशा २६८ शाळांना पोषण आहार पुरविण्‍यात येत आहे. या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील ९७ हजार ६३४ विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. पोषण आहारासाठी २० केंद्रीय स्वयंपाकगृहांची संख्या आहे.

शासनाच्या नवीन निर्णयानुसार, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर पोषण आहारात शहरातील पात्र शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यास आठवड्यातील प्रत्येक बुधवार किंवा शुक्रवारी एक अंडे आणि अंडी न खाणाऱ्यांना एक केळी देण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. पण, बहुतेक शाळांनी केळी स्वस्त असल्याने महिन्यातून एकदाच केळी दिल्‍याची माहिती अनेक मुख्याध्यापकांनी दिली.

आकडे बोलतात

  • इयत्ता पहिली ते पाचवीचे विद्यार्थी - ५९७७७

  • इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी - ३७८५७

  • एकूण लाभार्थी विद्यार्थी - ९७६३४

  • केंद्रीय स्वयंपाक गृहसंख्या - २०

  • एकूण शाळा - २६८

पाच रुपयांपेक्षा जास्त खर्च नको!

डझनभर केळी ५०-६० रुपयांस मिळत असल्याने अनेक पुरवठाधारकांकडून पाच रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. अनेक शाळांमध्ये मध्‍यमवर्गीय मुले शिकत असल्याने बहुतांश मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अंडी देण्याला प्राधान्‍य दिले आहे.

अंड्याची किंमत सहा ते सात रुपये आणि शिजवायचा खर्च वेगळाच, अशीही स्थिती पाहायला मिळाली. परंतु, दुसरीकडे खर्च जास्त येत असल्याने पुरवठाधारकांनी अंड्याचे नियोजन टाळल्याचे दिसून येत आहे. पण, पाच रुपयांत ना फळ ना अंडे मिळते. त्यामुळे, या योजनेच्या अंमलबजावणीत अप्रत्यक्षरित्या अडचणी निर्माण होत आहे.

शासनाचा आदेश आल्‍यापासून अद्याप आमच्या मुलांना अंडी मिळाली नाहीत. पुरवठाधारकाच्या वाटप पत्रकात अंडी नाहीत. कधी कधी केळी, संत्री देतात. आमच्या मुलांना अंडी हवी आहेत.

- अशोक कदम, मुख्याध्यापक, किर्ती विद्यालय, निगडी.

आमची मुले पूर्वी खिचडी खात होती. आता खिचडीची चव बदल्‍याने खात नाही. अंडी मिळणार असल्याचे समजले आहे, मिळाली तर बरे होईल.

- दिपक जाधव, पालक, थेरगाव.

एकदाही आमच्या शाळेतील मुलांना अंडी मिळाली नाहीत. ना केळी मिळाली. बिस्‍किटे आणि सपक भात दिला जातोय. एकूणच आहारातून मुलांचे कुपोषण होत आहे.

- कैलास पवळे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड मुख्‍याध्यापक संघ.

सर्व पुरवठाधारकांना अंडी, केळी वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याची नोंद एमडीएम पोर्टलवर करण्यास सांगितले आहे. तसे होत नसेल; तर त्याची पाहणी केली जाईल.

- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

आदेशात काय?

शासनाच्या ७ नोव्हेंबर २०२३ च्या नवीन आदेशानुसार प्रतिविद्यार्थी नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थासाठी पाच रुपयेच खर्च करायचे आहेत. विद्यार्थ्यांना अंडी व केळी देण्यात येणार आहे. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असणारे फळ द्यावे, असे आदेशात म्हटले आहे. बहुतेक शाळांनी विद्यार्थ्यांना अंडे, अंडा बिर्याणी-पुलाव व फळे द्यावी, आदेशात स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT