पिंपरी-चिंचवड

दरवर्षीची शालेय खरेदीची लगबग...दुकानांमधील गर्दी...मुलांचा हट्ट...याला यंदा झालं काय?

आशा साळवी

पिंपरी : एरवी जून महिन्यात पालक आणि मुलांचीही शाळेची तयारी सुरू होते. त्यांना नव्या शालेय वर्षाचे वेध लागतात. शाळा किती तारखेपासून सुरू होणार, नवी कोरी पुस्तकं, वह्या, ड्रेस, दप्तरं वगैरे, काही खराब झालेल्या वस्तू नव्याने घेणे. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्ये सुरू होणार नाहीत. त्या कधी सुरू होतील, हे देखील अनिश्चित आहे. परिणामी यावर्षी शालेय साहित्य खरेदीची लगबग दिसत नसल्याने दुकाने ओस पडली आहेत.

दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते.  मे महिन्याच्या अखेरीसच बाजारपेठेत शालेय साहित्य आलेले असते. परंतु, यंदा लॉकडाऊनमुळे अद्यापही शालेय साहित्याचे उत्पादनच सुरू झालेले नसल्याचे उत्पादक राजेश नहार यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष जुलै महिन्यापासून सुरू होते. याबद्दलही स्पष्टता नाही. तरीही फी पेंडिंग, फी भरा म्हणून न चुकता मेसेज पाठवणाऱ्या शाळांनी यावर्षी 'एक्स्ट्रा चार्जेस' आकारून घरपोच वह्या पुस्तके पोचवली आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी कॅम्पमध्ये शालेय साहित्याची बाजारपेठेतील अनेक दुकानांत शालेय साहित्य विक्रीस असते. लहान मुलांची दप्तरे, सॅक, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, नकाशा व अन्य साहित्य येथूनच खरेदी करण्यासाठी दरवर्षी पालकांची गर्दी होते. परंतु, यंदाच्या वर्षी काहीच हालचाल नाही. शैक्षणिक वर्ष सुरू केव्हा होणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. शासनानेही याबाबत अजूनही काहीच निर्णय दिलेला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बहुतांश भाग कंटेन्मेंट झोन असल्याने तेथील  दुकाने उघडण्यासही मनाई आहे. शाळांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शालेय साहित्याचा स्टॉक दुकानदार करून ठेवतात. यंदा मात्र काहीच हालचाल नसल्याने विक्रेते हातावर हात ठेवून बसले असल्याचे विक्रेते जिग्नेश ललवाणी यांनी सांगितले.

"यावर्षी कच्चा माल नाही, वाहतुकीसाठी कामगार नाहीयेत, त्यामुळे कागदाचे दर वाढल्याने यावर्षी वह्यांचे दर 25 ते 30 टक्के वाढण्याची शक्यता आहे." 
-राजेश नहार, वह्यांचे उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT