Fire Sakal
पिंपरी-चिंचवड

Scrap Shop Fire : आकुर्डीत भंगाराच्या दुकानास आग; चार जण जखमी

गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आकुर्डी येथील भंगाराच्या दुकानाला शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. त्यात चार जण जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आकुर्डी येथील भंगाराच्या दुकानाला शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. त्यात चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील अक्षय स्क्रॅप सेंटरला (सिद्धेश्वर क्लासिक सोसायटी समोर, आकुर्डी गावठाण) शुक्रवारी सायंकाळी आग लागली. याबाबत मयूर केदारे यांनी कळविले. अग्निशमन दलाचे जवान व बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

आगीमध्ये मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, प्लास्टिक, परफ्यूमचे (बॉडी स्प्रे) रिकामे कॅन, भंगार बॅटरी, घरगुती भंगार प्लास्टिक वस्तू आदी जळाले. भंगार दुकानाच्या आतील बाजूस छोट्याशा पत्र्याच्या घरामध्ये राहणारे चार जण भाजले. त्यामध्ये पोपट आडसूळ (वय ६०), संतोष चव्हाण (वय ४५), नरेश चव्हाण (वय ३८) व‌ श्रीकांत कांबळे (वय ३३) यांना भाजले आहे. पाच ते वीस टक्क्यांपर्यंत त्यांना भाजले आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.

स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रिक्षाद्वारे रुग्णालयात दाखल केले.‌ घरामध्ये स्वयंपाक करत असताना मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने भडका घेऊन आग लागल्याचे जखमींनी सांगितले.‌ अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासह प्राधिकरण, थेरगाव उप अग्निशमन केंद्रातील बंबांच्या सहाय्याने ३२ कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT