Shivneri bus and tanker Accident
Shivneri bus and tanker Accident sakal
पिंपरी-चिंचवड

Accident : शिवनेरी बस धडकली टँकरला; चालक गंभीर, आठ प्रवाशी किरकोळ जखमी

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

वाकड - मुंबई-बंगळूरु महामार्गावर चुकीच्या पद्धतीने थांबलेल्या टँकरला मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या शिवनेरी बसने मागुन जोरदार धडक दिली. यात बसचालक गंभीर व आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुनावळे येथील हॉटेल गुरुवारी (ता. १४) दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला.

राजेंद्र हनुमंत कदम (वय-५०) असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. अपघात होताच पळून गेलेल्या टँकर चालकावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. चालक कदम हे केबीनमध्ये अडकून पडल्याने सुरुवातीला उपस्थितांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र, ते गंभीर जखमी झाल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. अपघातस्थळी दाखल झालेल्या रावेत पोलिसांनी याकामी मदत केली.

याबाबत माहिती अशी, शिवनेरी बस (एमएच ०१ सीव्ही ०६३८) ही बस १८ प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने जात होती दरम्यान तोरणा हॉटेल जवळ चढावर चुकीच्या लेनमध्ये टँकर (जीजे १२, बीएक्स ७१६७) थांबला होता ते बस चालकाच्या लक्षात न आल्याने टँकरला मागून धडक बसली. कदम यांना नंतर खाजगी रुग्णालयात तर बसमधील किरकोळ जखमींना पुनवळेतील खाजगी रुग्णालयात तर काहींना थेरगावातील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडी

शिवनेरी बसच्या मागून येणारी आलिशान मोटार (एमएच ४३, बी एन ५५९१) धडकल्याने तिचे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रावेत पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT