पिंपरी-चिंचवड

तुम्ही पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे प्रवास करतात का, मग ही बातमी वाचा...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे-लोणावळा दरम्यान लोहमार्गावर सुरू असणारे ऑटोमॅटिक सिग्नलचे (स्वयंचलित यंत्रणा) काम पूर्ण होण्यासाठी आणखी नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत रेल्वे प्रशासनाने लोणावळा ते चिंचवड दरम्यानचे काम पूर्ण केले असून, चिंचवड ते शिवाजीनगर दरम्याने काम प्रलंबित आहे. येत्या सप्टेंबरपासून या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मार्चअखेपर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

प्रवासाच्या वेळेची बचत... 

आतापर्यंत लोणावळा ते चिंचवड दरम्यानच्या मार्गावरील ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे रेल्वेगाड्या अचूक वेळेत धावत असून, प्रवासाच्या वेळेतही बचत होऊ लागली आहे. ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणेमध्ये प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे रेल्वेची वाहतूक वेळेत सुरू आहे. या अगोदर सिग्नल मिळाल्यानंतर रेल्वे गाड्यांना थांबावे लागायचे, तो त्रास आता कमी झाला आहे. चिंचवड ते शिवाजीनगरपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर यामार्गावरील रेल्वे वाहतुकीमध्ये अधिक सुलभता येणार आहे. ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणेमुळे रेल्वे वाहतुकीमध्ये सुलभता येत आहे. या सुविधेमुळे जादा गाड्या चालवणे रेल्वेला शक्‍य झाले आहे. सध्या पुणे ते लोणावळा मार्गावरील गाड्यांचे भारमान वाढले असून, ते 140 टक्‍यांपर्यंत गेल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवासी म्हणतात... 

ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणेमुळे या मार्गावर कुठेही न थांबता प्रवास होत आहे. पूर्वी सिग्नलला गाडी थांबल्यामुळे पोहोचण्यास उशीर व्हायचा. आता त्यामध्ये सुधारणा झाली असल्याचे लोणावळा ते चिंचवड दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या के. संतोष यांनी सांगितले. चिंचवड ते शिवाजीनगर दरम्यानचे काम रेल्वे प्रशासनाने वेळेअगोदर पूर्ण केले तर प्रवाशांना त्याचा फायदा होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत रेल्वेने पुणे ते लोणावळा मार्गावर लोणावळा ते चिंचवडपर्यंतच्या 48 किलोमीटर मार्गावरील ऑटोमॅटिक सिग्नलचे काम पूर्ण केले आहे. आता चिंचवड ते शिवाजीनगर हे 15 किलोमीटरचे काम बाकी आहे, त्यासाठीचे टेंडर काढण्यात आले असून, लवकरच त्याला सुरुवात होणार आहे. 

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT