पिंपरी-चिंचवड

दारिद्य्र रेषेखालील खेळाडूंसाठी सरकारने मदतीचा हात पुढे केला; मात्र...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दारिद्य्र रेषेखालील शिधापत्रिकाधारक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला असून, त्यांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. मात्र, त्याबाबतचे परिपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला (डीएसओ) उशीराने मिळाले असून, अर्ज भरणा करण्याची मुदतही उलटून गेली आहे. त्यामुळे आर्थिक मदत मिळण्याच्या खेळाडूंच्या आशेवर पुरते पाणी फिरले आहे. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रकारांतील अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी किंवा पदक विजेत्या दारिद्य्र रेषेखालील खेळाडूंना राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी त्याबाबत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अर्ज सादर करण्याची मुदत उलटून गेली असल्याने खेळाडूंना आर्थिक मदतीपासून वंचित राहणार आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेळाडूचे नाव, पत्ता, मोबाईल क्र., ई-मेल आयडी, खेळ प्रकार, स्पर्धेचे नाव, स्पर्धा ठिकाण आणि कालावधी अशा स्वरुपाची माहिती अर्जाद्वारे खेळाडूंकडून मागविण्यात आली होती. दारिद्य्र रेषेखालील बीपीएल शिधापत्रिकाधारक आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते. मात्र, त्याबाबतचे आदेश 'डीएसओ' कार्यालयाला उशीराने मिळाले. या काळात अर्ज करण्याची 28 मेपर्यंतची मुदतदेखील उलटून गेल्याचा प्रकार घडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान म्हणाले, "राज्य शासनाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील अधिकृत क्रीडा स्पर्धांमधील सहभागी आणि पदकप्राप्त बीपीएल शिधापत्रिकाधारक खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले होते. 22 तारखेचे हे पत्र होते. मात्र, आम्हाला उशीराने मिळाले. या पत्रानुसार, शासनाला जिल्हानिहाय यादी पाठवायची आहे. आमच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रकारातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारे बीपीएल शिधापत्रिकाधारक खेळाडू नाहीत. मात्र, आम्ही क्रीडा संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून या खेळाडूंची माहिती मागविली आहे. अर्ज सादर करण्याची मुदत उलटून गेली आहे. मात्र, कोणी एखादा खेळाडू असल्यास त्यासाठी वरिष्ठ पातळीवर नक्कीच पाठपुरावा केला जाईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

RICH ZODIAC SIGNS: या राशींच्या लोकांकडे अचानक येतो इतका पैसा की जगतात हवं तसं आयुष्य! मेहनत आणि भाग्य दोन्हींची मिळते साथ

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

Manchar News : मंचर एसटी आगाराच्या ताफ्यात ‘जिजाऊं’ची भरारी; पाच नव्या एसटी बस दाखल, लवकरच अजून पाच एसटी बस मिळणार

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT