पिंपरी : आपण खाऊन पिऊन 'मस्त चाललंय आमचं' म्हणत लॉकडाउनचा आनंद घेतोय. मात्र, लॉकडाउनचा परिणाम शहरातील भटक्या प्राण्यांवर जाणवतोय. विशेषत: कुत्र्यांवर. रस्त्यावर त्यांच्या झुंडीच्या झुंडी अंतराने बसलेले दिसतील, तेही सोशल डिस्टन्सिंग राखून. सध्या खायला-प्यायला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते सतत अन्नाच्या शोधात भटकंती करताहेत. गेल्या दीड महिन्यापासून उपासमारीने त्रस्त असलेली भटकी कुत्री चवताळली आहेत. परिणामी रस्त्यांवर माणसांऐवजी त्यांचा वावर वाढलेला दिसतो आहे.
महत्त्वाची बातमी : #VeryPositive : दीड महिन्याचं बाळ; कावीळनंतर कोरोनाशी लढला अन् जिंकला
शहरात तब्बल 90 हजार भटकी कुत्री आहेत. त्यांच्या पोटापाण्याची सोय हॉटेल, चायनीजचे स्टॉल, ठेले, रेस्टॉरंटमधील फेकलेले अन्न, बाजारांमधील उरलेला माल, नागरिकांनी टाकलेले शिळे अन्न यातून व्हायची. अनेक श्वानप्रेमी, संस्थादेखील दररोज सकाळ आणि सायंकाळी दूध, बिस्किटे, इतर अन्नपदार्थ त्यांना द्यायची. पण आता गेल्या दीड महिन्यापासून ते बंद झाले आहे. लॉकडाउनमुळे शहरातील हॉटेल, खानावळीपासून घरेदारे बंद ठेवली जात आहेत. घरात फारसे अन्न शिळे राहू नये, यावर गृहिणींचा भर आहे. तर बऱ्याच स्वयंसेवी संस्था व व्यक्तींना घरातून बाहेर पडणे अडचणीचे झाले आहे. अशा परिस्थितीत लोक बाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यावर भटकणारे कुत्री उपाशी मरत आहे. रस्त्यांवर शुकशुकाट असून सर्वत्र शांतता अशी स्थिती असल्याने कुत्र्यांना नेमके कळेनासे झाले आहे.
आता निपचित अन् आक्रमक
रस्त्यावर भटकणारे कुत्री, हे अन्नाच्या शोधात वणवण भटकत आहेत. हॉटेलच्या खरकटं अन्नावर जगणारी कुत्री आता निपचित पडलेली दिसून येतात. त्यांना अन्न टाकायला कोणी पुढे येईनात. बंद वातावरणामुळे त्यांचे खाणे-पिणे कमी झाले आहे. त्यामुळे कचराकुंडी एकच त्याचा आधारकेंद्र बनले असले, तरी तेथे पुरेसे अन्न त्यांना मिळत नाहीये. अनेक ठिकाणी उपाशीपोटी आक्रमक पद्धतीने ते वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते रात्री अन्नाच्या शोधात घोळक्याने निघत आहेत. काही ठिकाणी हमखास त्यांचे घोळके दिसून येतात. आता ती आक्रमक झाले असून, ते अंगावर धावून येत आहेत. अगदी जागेवर थांबले तरी त्यांच्यातील आक्रमकता कायम राहत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा > आयटीयन्सना 'तारीख पे तारीख' मिळण्याचं खरं कारण...
नागरिकांनी भूतदया दाखवा
भटक्या कुत्र्यांची अवस्था खरोखरच दयनीय झाली आहे. पोटातील भूकेमुळेच ते आक्रमक होत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यासाठी शहरातील नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा. या भटक्या कुत्र्यांवरदेखील भूतदया दाखविणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपापल्या वस्ती, कॉलनीत त्यांच्यासाठी अन्नाची सोय करणे आवश्यक आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.