mahesh landge
mahesh landge sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ‘युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना देशातील कॉलेजमध्ये संधी द्यावी’

, सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रात परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काही नियम शिथिल करून देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली जावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

मुंबईत विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात युक्रेनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे आमदार लांडगे यांनी महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले. आमदार लांडगे म्हणाले की, युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे, तसेच आर्थिक नुकसानही होणार आहे. परिणामी, संबंधित पालक आणि विद्यार्थी तणावात आहेत. पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरातील ३४ विद्यार्थी युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. मात्र, तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे ते पुन्हा भारतात परतले आहेत. आता त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील चिंतेत आहे.

विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे मेडिकलचे शिक्षण अपूर्ण राहू नये. यासाठी संबंधित विद्यार्थी भारतातून इंटर्नशिप करू शकतील, असे अध्यादेश केंद्र सरकारने काढले आहेत. त्या धर्तीवर महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांना एखाद्या शासकीय किंवा खासगी शिक्षण संस्थेमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT