Swimming Tank
Swimming Tank Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड मध्ये स्विमिंग महागले; खेळाडूंचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड जलतरण तलावांच्या शुल्कामध्ये तिपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दैनंदिन १० रुपये शुल्काऐवजी आता ३० रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. त्यामुळे वार्षिक शुल्क १ हजार रुपयांवरून आता तीन हजार रुपये होणार आहे. यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली असून, महापालिका सभेपुढे मान्यतेसाठी शिफारस केली आहे, त्यामुळे पोहणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

सध्या महापालिकेचे १२ जलतरण तलाव आहेत. तलावांपासून मिळणारे उत्पन्न व खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, सर्वसामान्यांना हे शुल्क परवडणारे नाही. परिणामी, जलतरणपटू घडणार कसे हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता सर्वसाधारण दर मासिक शुल्क ६०० रुपये, त्रैमासिक शुल्क १२०० रुपये, सहामाही शुल्क २१०० रुपये, वार्षिक शुल्क ३ हजार रुपये होणार आहे. एकावेळचे नोंदणी शुल्क ३०० रुपये केले जाणार आहे. तर लॉकर फी तिमाही १५०, सहामाही २००, वार्षिक ३०० रुपये होणार आहे.

नेहरूनगर जलतरण तलावावर सराव, शिबिर व स्पर्धेसाठी सार्वजनिक संस्था, शाळा, कॉलेज, कंपनी, क्लब यांना १ तासाचे भाडे १५०० रुपये आहे. तसेच इतर जलतरण तलावांना एकातासाचे भाडे १२०० व विद्यार्थी, खेळाडू, शाळा, कॉलेजसाठी एकातासाचे भाडे १५०० इतके आहे. अठरा वर्षांवरील मुले, मुली यांना मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक शुल्कामध्ये सर्वसाधारण शुल्काच्या ५० टक्के सवलत राहील. तसेच महापालिका सदस्य, खेळाडू दत्तक योजनेतील खेळाडू, विद्या खेळाडू, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग नागरिक यांना शुल्काच्या शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे.

लिपिक, जीवरक्षक, सुरक्षा कर्मचारी खर्च, स्थापत्य कामे, पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, यांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च होत आहे. त्यामध्ये एक लिपिक व चार जीवरक्षक यांच्या वेतनावर १ कोटी ७३ लाख २० हजार इतका खर्च झाला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर ६४ लाख ७६ हजार रुपये, स्थापत्य कामांवर ४६ लाख ९४ हजार रुपये, व विद्युत बिलांसाठी ४६ लाख ९४ हजार रुपये इतका खर्च झाला आहे. अपंग, महापालिका कर्मचारी, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, ज्येष्ठ नागरिक यांना सर्वसाधारण दरापेक्षा ५० टक्के सवलत आहे. एका व्यक्तीसाठी गेस्ट तिकीट म्हणून प्रतिदिन एका वेळेसाठी १० रुपये शुल्क आकारले आहे.

बारा जलतरण तलावांपासून मिळालेले उत्पन्न

२०१७-१८ : ६२,९८,४६४

२०१८-१९ : ६८,१९,६९५

२०१७ -१८ मध्ये जलतरण तलावांवर झालेला खर्च : ४,८१,१३,०२४

पालिकेवरील बोजा : ४ कोटी १८ लाख

१२ वर्षांखालील मुलांसाठी शुल्क

तिमाही : २०० रुपये

सहामाही : ३५० रुपये

वार्षिक : ५०० रुपये

१२ वर्षावरील व्यक्तींसाठी शुल्क

तिमाही : ४०० रुपये

सहामाही : ७०० रुपये

वार्षिक : १००० रुपये

गेल्या कित्येक वर्षांपासून जलतरण तलावांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. बऱ्याच तलावांची डागडुजी सुरू आहे. सध्या तीन तलाव सुरू केले आहेत. बाकी तलावांचे काम झाल्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत.

- सुषमा शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT