Raju Chavan, janhavi Chavan and Daughter Chanhu Chavan sakal
पिंपरी-चिंचवड

Talegav Dabhade News : मुलीला शिकविण्यासाठी माता-पित्यांची धडपड; पोटापाण्यासाठी तळेगावात ‘गार्बेज बॅग’ विक्री

‘पोटापाण्यासाठी एकुलत्या एक मुलीच्या नशिबी आमच्यासारखे भटकणे येऊ नये, म्हणून पाच वर्षांच्या चन्हूला रद्दीतील पुस्तके चाळायला देतो.

रमेश जाधव

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - ‘पोटापाण्यासाठी एकुलत्या एक मुलीच्या नशिबी आमच्यासारखे भटकणे येऊ नये, म्हणून पाच वर्षांच्या चन्हूला रद्दीतील पुस्तके चाळायला देतो. तिलाही आता पुस्तकांतील चित्रांचा लळा लागलाय. ती खूप प्रश्न विचारते.’ रस्त्याच्या कडेला गार्बेज बॅग विक्री करणारा राजू चव्हाण सांगत होता. शेजारी त्याची पत्नी जानव्ही आणि मुलगी चन्हू या दोघी पुस्तकात डोके घालून बसल्या होत्या.

घरातला कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काळ्या प्लास्टिक बॅग विक्री करून पोटासाठी मिळणाऱ्या कमाईतील किमान दीड-दोनशे रुपये मी चन्हूला पुढच्या वर्षी शाळेत टाकण्यासाठी जमा करते. एखाद दिवशी धंदा झाला नाही, तर वडापाव आणि चुरा हेच आमचे जेवण, असे जानव्ही सांगत होती.

‘एमआयडीसी’त काम मिळाले म्हणून आलो होतो. पण लॉकडाउन लागले. ठेकेदार गावी निघून गेला. मी वराळे गावात खोली भाड्याने होती. मालक चांगला होता. भाजीपाला विकायला सुरुवात केली. पण रस्त्याच्या कडेला बसल्याने नगरपालिकेचे माणसे बसून देत नव्हती. आता या बॅगा विकतो.

परिसरातील शाळांच्या रस्त्याच्या कडेला आम्ही बॅगा विकतो. कारण शाळा भरताना आणि सुटल्यावर चन्हूला त्या मुलामुलींना दाखवता येते, असे राजू सांगत होता. चन्हूला शिकायला शाळेत पाठवायची तयारी ते गेल्या दीड दोन वर्षांपासून करीत आहेत.

तिच्यावर पुस्तकांचे संस्कार करून आवड निर्माण करत आहेत. चार पैसे शाळेची फी, कपडे, पाटी, पुस्तके, वह्या आणि तिच्यासाठी एक बॅग घेण्यासाठी जमवत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

Latest Marathi News Live Update : भिवंडीतील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग; दोन गोदाम जळून खाक

4 वर्ष अमेरिकेत राहून मृणाल दुसानिस भारतात का परतली? म्हणाली...'भारतात येण्याचा निर्णय घेतला कारण...'

SCROLL FOR NEXT