Ganapati
Ganapati Sakal
पिंपरी-चिंचवड

गणेशमूर्तीची उंची चार फुटांपर्यंतच हवी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडू माती अथवा कागदी लगद्यासारख्या विघटनशील घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. सार्वजनिक मंडळांनी चार फुटांपर्यंत, तर घरातील गणेशमूर्तीची दोन फुटांपर्यंत उंची असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे. घरगुती आरास व देखाव्यांसाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर करू नये,’’ असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले. (PCMC News)

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त व महापौर उषा ढोरे यांनी गणेश भक्तांना आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाण्याचा स्रोत दूषित करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित न होण्यासाठी नागरिक व गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘यंदाचा गणेशोत्सव कोरोनाविषयक नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करावा.’’

आयुक्तांच्या सूचना

  1. गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्याघरी करावे

  2. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये

  3. मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन हौद नसतील

  4. मूर्तीसह निर्माल्य दान स्वीकारण्यासाठी फिरते रथ

  5. आरती, भजन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रमास मनाई

  6. मंडळांनी आरती व दर्शनाची सुविधा ऑनलाइन करावी

  7. आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई

  8. गणेश मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करून घ्यावे

  9. थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT