Three in police custody till 14th case of ink on Chandrakant Patil politics Esakal
पिंपरी-चिंचवड

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी तिघांना १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश पिंपरी न्यायालयाने रविवारी दिला. आरोपींमध्ये समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. समता सैनिक दलाचा संघटक मनोज भास्कर घरबडे (वय३४, रा. पिंपरी), समता सैनिक दलाचा सदस्य धनंजय भाऊसाहेब इजगज (वय २९, र. आनंदनगर, चिंचवड), वंचित बहुजन आघाडी चा सचिव विजय धर्मा ओव्हाळ (वय ४०, रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर शनिवारी चिंचवड येथील एका धार्मिक कार्यक्रमास पाटील शनिवारी (ता.१०) सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा उदघाटनासाठी चिंचवडगाव येथे आले. उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्याच्या घरी चहापानासाठी थांबले. यानंतर सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यावर काही क्षणात त्यांच्या अंगावर शाई फेकली. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांची धावपळ उडाली. पाटील यांना पुन्हा शेडगे यांच्या घरी नेले.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्यांना रविवारी पिंपरी न्यायालयात हजर केले. दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व अन्य संघटनांनी चिंचवड येथील चापेकर चौकातून पिंपरी न्यायालयापर्यंत मोर्चा काढला.त्यामुळे न्यायालय परिसरात तणाव होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT