Thugaon Sakav bridge dangerous for two-wheelers 
पिंपरी-चिंचवड

थुगाव साकव पूल केव्हाही ढासळु शकतो; दुचाकी वाहतूकही बंद करा

सकाळ वृत्तसेवा

बेबडओहोळ (पिंपरी) : थुगाव साकव पुलावरील चार मोऱ्या मागील वर्षी वाहून गेल्याने हा पूल कधीही ढासळू शकतो. पुलावरून दुचाकी वाहनांची वाहतूक पाहता येथील दुचाकीस्वारांसाठी ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पूल पूर्णत: बंद करण्याची मागणी होत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थुगावचा साकव पुलाचे बांधकाम ३५ वर्षापुर्वी करण्यात आले. त्या वेळेस असणारी वाहतुकीच्या विचाराने हा पूल बांधण्यात आला. हा पूल अवजड वाहने याकरिता नसल्याने तो बैलगाडी व हलकी वाहने यासाठी बांधला होता. माञ, गेली पंधरा वर्षांत पवन मावळातील गावांचा खूप वेगात विकास झाला. पुलाजवळील परिसरात वाढलेली बांधकामे, वस्तीकरण परिसरातील औद्योगिकरण यामुळे या पुलावरून मोठे अवजड वाहनांची वाहतूक गेली पंधरा वर्षांपासून वाढली.

अवजड वाहनांना परवानगी नसताना देखील मोठे वाळुचे ट्रक सतत जात असल्याने पुलाची लवकरच खिळखिळ झाली. सततच्या अवजड वाहनांमुळे मोऱ्या जीर्ण होऊन हळुवारपणे पडत गेल्या व मागील झालेल्या मुसळधार पावसामुळे या मोऱ्या वाहून गेल्या. त्यानंतर पुलावरून वाहतूक बंद असा फलक पाटबंधारे विभागाने लावल्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली. गेली वर्षापासून पुल बंद असल्याने नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ''पुल लवकर सुरु व्हावा'', अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती पण, वर्षभरात कुठलीच हालचाल बांधकाम विभागाकडून करण्यात आली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नुकतेच आमदार सुनिल शेळके यांनी पवन मावळातील साकव पुलांची पाहणी केली त्यात थुगाव पुलाचीही पाहणी केली व लवकरच पुलाचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. जवळील गावांमध्ये दळणवळणाकरीता जवळचा मार्ग असल्याने सहा गावातील ग्रामस्थ दुचाकीवरून धोकादायक प्रवास करतात. पण, सध्या हा पुल अतिशय धोकादायक स्थितीमध्ये असल्याने पुलावरील दुचाकी वाहतूकही बंद करावी अशी ग्रामस्थ मागणी करीत आहे. 


थुगाव पुलाची सध्यस्थिती 
३५ वर्षापुर्वीचा जुना साकव पुल.
कधीही ढासळू शकतो पुल.
चार मो-या वाहुन गेल्या ने धोकादायक.
दुचाकी वाहतुक तत्पर बंद करावी.
सहा गावातील वाहतुकीसाठी महत्वाचा.
चारचाकी वाहनांना दहा किलोमीटर वेढा मारून जावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT