पिंपरी-चिंचवड

तीनही पी एकत्र आल्यास समाजाची प्रगती - सुनिल चांदेरे

CD

तीनही ‘पी’ एकत्र आल्यास
समाजाचे कल्याण ः चांदेरे

वाकड, ता. ९ : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार त्याचबरोबर राजकीय पुढारी अन् पोलिस हे समाजातील तीनही ‘पी’ंनीं एकत्र येत समन्वय साधून, योगदान दिल्यास समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन पुणे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचीत संचालक सुनील चांदेरे यांनी मारुंजीत केले
जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मराठी पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात मुळशी पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, अशोक धुमाळ, मोहन यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सचिन खैरे, युवानेते सुरेश हुलावळे, बाबाजी शेळके, राजेंद्र बांदल, अतिरिक्त गटविकास अधिकारी संजय ढमाळ, कृषी समितीचे संचालक दादाराम मांडेकर उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लकडे (वैद्यकीय सेवा), अविनाश चिलेकर (पत्रकारिता), पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुनील चांदेरे व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) संचालक सुखदेव तापकीर, लेखक बबन मिंडे, क्रीडा लेखक संजय दुधाणे आदींचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे समीर बुचडे यांनी आयोजन केले. ज्योती दवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT