पिंपरी-चिंचवड

जिजाऊंच्या विचाराने तरुणांनी जीवन जगावे

CD

भोसरी, ता. १३ ः ‘‘तरुणींनी जिजाऊंचे विचार अनुसरून आपले जीवन घडवावे. तरच उद्या घराघरांत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविण्याची प्रेरणा जिजाऊंनी दिली. स्वाभिमानाने संस्कार जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केले,’’ असे मत व्याख्याते गणेश पाटील यांनी व्यक्त केले.
भोसरीतील लांडेवाडेतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा’ या अभियानांतर्गत संस्थेच्या क्लब शंभर, सांस्कृतिक विभाग आदींद्वारे राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विलास लांडे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
लांडे म्हणाले, ‘‘राजमाता जिजाऊ यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून तरुण-तरुणींनी राष्ट्र उद्धारांचे कार्य करावे. तरुणांनी स्वतःसह कुटुंब व समाजाचा विकास करावा.’’ अश्विनी कुडेकर, दिव्या कांबळे, संगीता थोराजी, उत्कर्षा कोकीळ आदींनीही विचार व्यक्त केले. काजल प्रजापती हिने राजमाता जिजाऊंवरील गीत सादर केले. सूत्रसंचालन डॉ. नेहा बोरसे यांनी केले. प्रा दीपक पावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, वाहनचालक धडक देऊन पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

SCROLL FOR NEXT