पिंपरी-चिंचवड

स्पर्धा परीक्षा केंद्र उभारावे

CD

01190

-----
स्पर्धा परीक्षा केंद्र उभारावे
खासदार धैर्यशील माने; रुकडीमध्ये विकासकामांचा प्रारंभ
रुकडी, ता. २० : हे गाव ऐतिहासिक वारसा जोपासणारे गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेबांची पुण्याई म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक घटकांचा विकास साध्य करण्यासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून विविध विकासकामांचे उद्‍घाटन करण्याचे मला भाग्य लाभले. १०१ वर्षांच्या जुन्या बौद्ध समाज मंदिराची नवीन इमारत उभी करत असताना एखादे स्पर्धा परीक्षा केंद्र उभे व्हावे. जेणेकरून बहुजन समाजाचा युवक शासकीय अधिकारी बनेल, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. रुकडी येथे विविध विकासकामांचे उद्‍घाटन व नवीन कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
खासदार माने यांच्या प्रयत्नातून तब्बल दोन कोटी २८ लाखांच्या निधीतून बौद्ध समाज, रमामातानगर, भीमनगर, बौद्ध समाज स्मशानभूमी बांधकाम व कंपाऊंड, अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध मातंग समाज, चर्मकार समाज येथे हायस्मार्ट दिवे बसवण्यात आले. अशा विविध विकासकामांचे उद्‍घाटन तसेच ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या विकासकामांचा प्रारंभ केला. आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, ‘सर्व धर्म समान मानून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करीत राहीन.’ माजी सरपंच नंदकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच रफिक कलावंत, रणजित कदम, एस. पी. कांबळे, नंदकुमार शिंदे, शमवेल लोखंडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT