पिंपरी-चिंचवड

बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

CD

वडगाव मावळ, ता. ४ : लोकप्रतिनिधी महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध केला आहे. कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबूराव वायकर, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, नारायण ठाकर, आरती घारे, प्रवीण ढोरे, अतुल राऊत, मंगेश खैरे, उमा शेळके, शैलेश वहिले आदी पदाधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्राच्या या भूमीत महिला अतिशय सक्षमपणे काम करीत असताना कराडकर यांनी महिला प्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांची बदनामी करत समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. यापुढे महिला कर्तृत्वाची अशी नाहक बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे. वारकरी संप्रदायातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT