पिंपरी-चिंचवड

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना ३० डिसेंबरपर्यंत कोठडी

CD

पिंपरी, ता. २८ : पिंपळे गुरव येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या पथकावर आरोपींनी गोळीबार केलेल्या तिन्ही आरोपींना ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. खेड तालुक्यातील कोये-कुरकुंडी येथील या चकमकीत जखमी झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रकृती उत्तम आहे.
गणेश हनुमंत मोटे (वय २३), महेश तुकाराम माने (वय २३, दोघे रा. कवडेनगर, सांगवी), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २१, रा. विनायकनगर, नवी सांगवी) अशी या आरोपींची नावे आहेत. पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात १८ डिसेंबरला योगेश जगताप या सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडून खून झाला. याप्रकरणात हे तिन्ही आरोपी फरारी होते. हे आरोपी कोये-कुरकुंडी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरोपींना पकडण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह चार पथकांनी सापळा रचला.
दरम्यान, आरोपींना पकडत असताना गणेश व अश्विन यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तेथील एक बदामाच्या झाडाचे रोपटे उचलून आरोपींच्या अंगावर फेकल्याने तीनही आरोपी खाली पडले. त्यांनतर इतर पोलिसांनी झडप घालून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
या चकमकीत पोलिस आयुक्तांसह, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर व इतर तीन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान, या आरोपीवर चाकण पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, प्राणघातक हल्ला, शस्त्र बाळगणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली.
दरम्यान, ज्याठिकाणी चकमक झाली ते ठिकाण पाहण्यासाठी परिसरातील लोक जात आहे. नेमकी घटना कशी व कुठे घडली, झाड कोणते होते, याबाबत जाणून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT