पिंपरी-चिंचवड

लसीकरण

CD

शहरात आज आणि उद्या लसीकरण

पिंपरी, ता. ३१ ः अठरा वर्षांवरील लाभार्थ्यांना महापालिकेच्या आठ ही प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हिशिल्ड’ लस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर शनिवारी (ता. १) ते रविवारी (ता. २) असे एकूण दोन दिवस प्रतिदिवशी २८ हजारांप्रमाणे कोविड लस देण्यात येणार आहेत.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत करण्यात येईल. लसीचा कोटा कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ५० टक्के लाभार्थी या पद्धतीने असणार आहे. एकूण २८०० पैकी ४०० कोविड डोस पहिल्या डोससाठी राखीव असून त्यातील कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने २०० डोस तर उर्वरित २०० डोस हे ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन’ कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य राहील. उर्वरित २४०० डोसेस दुसऱ्या डोससाठी राखीव असून त्यातील कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने १२०० डोसेस तर उर्वरित १२०० डोसेस हे ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत.

आज परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार डोस
शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यासह शनिवारी (ता.१) नवीन जिजामाता रुग्णालय या लसीकरण केंद्रावर मिळणार आहे. लाभार्थ्यांना सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत लसीचा पहिला डोस व दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त कागदपत्र आवश्‍यक आहे.

कोविन अॅपवर नोंदणी
महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी महापालिकेच्या वॉर्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. दोन दिवस प्रतिदिवशी सकाळी आठ वाजण्यापूर्वी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. स्तनदा व गरोदर महिलांचे लसीकरण करण्यासाठी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT