पिंपरी-चिंचवड

दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा खून

CD

पिंपरी, ता. २ : गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात तरुणाचा खून झाल्याची घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
सुनील शिवाजी सगर (वय ३५, रा. कॉलनी क्रमांक २, जाधववाडी, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार १४ व १७ वर्षीय मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सुनील हे कामावरून घरी येत होते. तर आरोपी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी जाधववाडी शिवरस्ता येथे दुचाकीचा सुनील यांना धक्का लागला. त्यामुळे सुनील यांनी एकाच्या कानशिलात मारली. याचा राग आल्याने दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे सुनील पळत जान बोल्हाईमळा कॉलनी क्रमांक सहा येथील किराणा दुकानात शिरले. तिथे सतरा वर्षीय मुलाने सुनील यांना दुकानाबाहेर ओढून काढले व दोघांनी मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दोन ते तीन वेळा दगड मारल्याने रक्तस्त्राव होऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळी गर्दी झाल्याने दोघेही पळून गेले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सुनील यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी मालकाचा शोध घेतला. ती भोसरी येथील बिरेंद्र चव्हाण यांची होती. त्यांच्या घरी चौकशी केल्यानंतर त्यांचा मुलगा विजयने त्याच्या मित्रांना दुचाकी दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Latest Marathi News Live Update : भारत सरकार काळजी घेतंय, पाकिस्तान, बांगलादेशची अवस्था बघा : मुख्यमंत्री फडणवीस

Latur News: बारा बंधाऱ्यांची होणार दुरुस्ती; शासनाकडून ३३ कोटी ७७ लाखांचा निधी; लवकरच कामांना सुरवात

इंडिगोच्या प्रवाशांचं हाल! लंडन ते मुंबई ९ तासांच्या प्रवासाला लागले ३ दिवस, अचानक इजिप्तमध्ये उतरवलं; नुकसानभरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT