पिंपरी-चिंचवड

पुण्यातील उद्याने, मैदाने आजपासून खुली जलतरण तलावांसाठीच्या नव्या नियमांमुळे संभ्रम

CD

पुणे, ता. २४ ः शहरातील उद्याने मंगळवारपासून सकाळी ६ ते ९ दरम्यान खुली राहणार असल्याचे महापालिकेने आज जाहीर केले. मैदानेही खुली होत आहेत. मात्र, जलतरण तलाव हे फक्त राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठीच उघडले जातील, असे म्हटल्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा हवेतच विरल्याचे स्पष्ट झाले. १८ वर्षाच्या आतील जलतरणपटूंसाठी कोणते धोरण असेल, याबाबतही महापालिकेने स्पष्टता न केल्यामुळे संभ्रम वाढला आहे.

कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री पवार यांनी उद्याने उघडण्याबाबत कल्पना दिली होती. त्यानुसार महापालिकेने उद्याने मंगळवारपासून सकाळी ६ ते ९ दरम्यान उघडी राहतील, असा आदेश काढला. उद्याने सुरू राहवीत, यासाठी व्यायामप्रेमी नागरिकांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. सर्व मैदानेही व्यायामप्रेमींसाठी मंगळवारपासून खुली होतील. महापालिकेने काढलेले आदेश पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांनाही लागू असतील.

जलतरण तलाव राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळडूंच्या सरावासाठीच खुले राहणार आहेत. त्या खेळाडूंचे लशीचे दोन डोस झालेले असतील, त्यांनाच तेथे प्रवेश आहे. त्यातही दुसऱ्या डोसनंतर १४ दिवस झाले असतील तरच प्रवेश मिळेल, असे आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
आदेशामुळे जलतरणपटूंमध्ये संभ्रम
लशीचे दोन डोस झालेल्या सर्वांसाठी जलतरण तलाव खुले करण्यात येतील, असे पालकमंत्री पवार यांनी म्हटले होते. मात्र, महापालिकेच्या आदेशात ‘‘जलतरण तलाव फक्त खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठीच खुले राहतील,’’ असे म्हटले आहे. त्यामुळे जलतरणपटूंमध्ये संभ्रम आहे. १८ वर्षाखालील खेळाडंचा एकही डोस झालेला नसेल तर, त्यांना प्रवेश दिला जाणार का, या बाबतही महापालिकेच्या आदेशात स्पष्टता नाही. जलतरण प्रशिक्षक मनोज एरंडे म्हणाले, ‘‘दोन डोस घेतलेल्या सर्वांसाठीच जलतरण तलाव खुले करणे गरजेचे आहे. काही नागरिकांनाही वैद्यकीय कारणांसाठी जलतरणाची गरज असते. त्यांनाही परवानगी द्यायला हवी. दोन डोसची अट कायम ठेवून परवानगी देता येऊ शकेल. महापालिकेने या बाबत विचार करायला हवा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT