पिंपरी-चिंचवड

भारत फ्लॅग फाउंडेशनची मोहीम

CD

पुणे ः प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान होऊ नये, म्हणून भारत फ्लॅग फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. नागरिकांना असे ध्वज आढळल्यास ते पासोड्या मारुती मंदिरासमोरील फाउंडेशनच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक गिरीश मुरुडकर व कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी केले आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना होते. ही विटंबना रोखण्यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेतला असून या उपक्रमाचे हे एकविसावे वर्ष आहे. यात जमा झालेल्या साहित्याची शास्त्रशुद्ध, सन्मानपूर्वक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती मुरुडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT