Traffic
Traffic Sakal
पिंपरी-चिंचवड

हिंजवडीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तीने वाहन चालविणाऱ्यांवर हिंजवडी वाहतूक विभागाने धडक कारवाई केली. या अंतर्गत एक हजार ५८८ वाहन चालकांकडून तब्बल नऊ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीतील भुजबळ चौक, इंडियन ऑइल, शिवाजी चौक, विप्रो फेज -१, जॉमेट्रिक सर्कल, टाटा टी जंक्शन, विप्रो सर्कल -२, राधा चौक, बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी पथक नेमून बुधवारी (ता. १२) कारवाई करण्यात आली.(Action against violators of traffic rules in Hinjewadi)

यासाठी ८३ कर्मचारी, २१ ट्रॅफिक वॉर्डन व नऊ जलद प्रतिसाद पथक तैनात केले होते. ट्रिपल सीट वाहन चालविणे, काळ्या काचा वापरणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वाहनाला साइड आरसा नसणे, विना परवाना वाहन चालविणे, सायलेन्सरमध्ये बदल करणे, विना हेल्मेट, पोलिस सूचनांचे पालन न करणे अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८४४ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला . त्यांच्याकडून पाच लाख ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ज्या चालकांना ऑनलाइन पद्धतीने आकारलेला दंड भरला नाही, अशा ७१४ चालकांकडून तीन लाख ६२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.(Pune Traffic news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT