crime
crime Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक

प्रशांत पाटील

वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’साठी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली.

पिंपरी - वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) ‘एमबीबीएस’साठी प्रवेश (MBBS Admission) देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केली. हा प्रकार पिंपरीतील वल्लभनगरमधील एचए कॉलनी येथे घडला.

याप्रकरणी किरण सुवर्णा (रा. पिंपरी) याला अटक केली असून आय.एस.एन.आर. कॉलेजचे प्रमुख देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी किरण याने फिर्यादी महिलेच्या मुलीला वैद्यकीय शाखेच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाला प्रवेश देतो, असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही आरोपींनी त्यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश दिला नाही. तसेच त्यांचे पैसेही परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT