पिंपरी-चिंचवड

साडे चार लाखांची फसवणूक

CD

पिंपरी, ता. ४ : साडे चार लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर ऑपरेटरवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ताथवडे येथे घडला.
याप्रकरणी सागर अशोक नरवाडे (रा. सुखवानी कलरनिक सोसायटी, औंध-रावेत बीआरटी रोड, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश बाळासाहेब माने (वय ३१, रा. मालखेड, ता. कराड, जि . सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा ताथवडे येथील संघवी मूव्हर्स लिमिटेड कंपनीत असिस्टंट मॅनेजर ऑपरेटर म्हणून कमला आहे. कंपनीचे काम सुरू असलेल्या साइटवर कर्मचारी यांची ये-जा करण्यासाठी गाड्या भाड्याने घेणे, त्यांचे भाडे ठरवणे, त्यांचे बिल बनवून कंपनीला पाठविणे तसेच कंपनीचे आरटीओकडील काम करणे, विविध प्रकारचे टॅक्स आरटीओ कार्यालयात भरणे व इतर नेमून दिलेली कामांची जबाबदारी त्याच्याकडे होती. दरम्यान, ही कामे करीत असताना आरोपीने कंपनीच्या व्हेंडरकडून चार लाख ६७ हजार ६९८ रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT