पिंपरी-चिंचवड

नो एन्ट्रीतून घुसविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू

CD

सोमाटणे, ता. १४ ः प्रवेश बंदमधून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला वाहन घुसविणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर असून, दंडातून सुटका नाही.
सोमाटणे टोलनाक्यावरील टोलवसूलीपासून सुटका करण्याच्या उद्देशाने पुण्याकडे जाणारे अनेक वाहनचालक द्रुतगती मार्गावरील सोमाटणे बाह्यमार्गातून वाहने आत घुसवतात व पुण्याकडे जातात. या प्रकारातून यापूर्वी येथे अनेक अपघात घडले असून, गेल्या दोन दशकांत दहा जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून येथे अपघात होण्याचे प्रमाण आणखी वाढले होते, याची दखल घेऊन महामार्ग पोलिसांनी प्रवेश बंदमधून वाहन घुसविणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे. यासाठी दिवसभर पोलिसांचे एक पथक सोमाटणे बाह्यमार्गाजवळ तैनात करण्यात आले आहे. या पोलिस पथकाकडून प्रवेश बंदमधून वाहन घुसविणाऱ्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. रोखीने दंडाची पावती न फाडणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनाचा फोटो काढून तो परिवहन विभागाला दंडासाठी पाठवणे ही कारवाई सुरू करण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. या कारवाईमुळे प्रवेश बंदमधून वाहने द्रुतगती मार्गाला घुसविणाऱ्या वाहनचालकांत भीती निर्माण झाली आहे. पोलिसांची नजर चुकवून काही वाहनचालक प्रवेश बंदमधून वाहने घुसवून सुसाट पळण्याचा प्रयत्न करतात, अशा वाहन चालकांच्या वाहनाचे फोटो काढून ते दंडासाठी परिवहन विभागाला पाठवणे सुरू केल्याने वाहन चालकांची दंडातून सुटका नाही.

५५६५४, ५५६५५

Smt13Sf1,2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT