पिंपरी-चिंचवड

घोटकुलेवाडी खुर्द येथे शाळेच्या नूतनीकरणाचे उद्‍घाटन

CD

ऊर्से, ता. ८ : फिडेल सॉफ्टेक कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून व थिंकशार्प फाउंडेशनच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील घोटकुलेवाडी खुर्द या जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लास, ग्रंथालय आणि शाळेच्या नूतनीकरणाचे उद्‍घाटन करण्यात आले.
घोटकुलेवाडी शाळेत आयोजित कार्यक्रमाला फिडेल सॉफ्टेक कंपनीच्या संचालिका प्राची कुलकर्णी, थिंकशार्प फाउंडेशनचे संस्थापक संतोष फड, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, बौर केंद्राचे केंद्रप्रमुख झंपू ताते, आढले केंद्राचे केंद्रप्रमुख विजय मारणे, परितोष दास, सरपंच नंदा भालेसेन, उपसरपंच मंदाताई घोटकुले, सदस्य पप्पू चांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल पशाले आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्राची कुलकर्णी यांनी कंपनीच्या कार्याबद्दल माहिती दिली. ‘‘तंत्रज्ञानाची ओळख जर शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना झाली तर प्रगत तंत्रज्ञानाबरोबर प्रगती करण्याची संधी त्यांना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आधुनिकतेची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित होईल,’’ असे मत विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी मांडले. या डिजिटल क्लासमध्ये देण्यात आलेल्या टीव्हीमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर वापरून ॲडव्हान्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवलं जाऊ शकते. तसेच यामध्ये शाळेचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑफलाइन दिलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालयातील आकर्षक पुस्तकांच्या वाचन वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच फायदा होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
मुख्याध्यापक राजू लोंढे यांनी प्रास्ताविक केले. गुलाब दाभाडे व राहुल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कैलास जगताप यांनी आभार मानले. दरम्यान, यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा हरित करण्याचा मनोदय व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Solapur District Dams: साेलापूर जिल्ह्यातील धरणे होणार आता गाळमुक्त; २१२ पैकी १६५ धरणांतून तीन वर्षांत काढला ११६ दलघमी गाळ!

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT