पिंपरी-चिंचवड

खंडित वीजपुरवठ्यामुळे भोसरीत नागरिकांचा संताप

CD

भोसरी, ता. २२ ः भोसरी गावठाण, पीएमटी चौक, सम्राट अशोकनगर, शांतिनगर, भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉकमधील शुक्रवारी (ता. २१) दुपारी बारा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा शनिवारी (ता. २२) चारनंतरही सुरळीत न झाल्याने नागरिक, व्यापारी यांनी संताप व्यक्त केला आहे.
भोसरी परिसरातील काही भागातील विद्युत पुरवठा शुक्रवारी (ता. २१) दुपारी बाराच्या सुमारास खंडित झाला. रात्री दहा वाजता वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, दहाच मिनिटांनी पुन्हा खंडित झाला. तो शनिवारी (ता. २२) सायंकाळी चारनंतरही सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पंखा बंद ठेवावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ईद आणि अक्षय तृतीयानिमित्त दूध अधिक प्रमाणात घेतल्याने ते सुस्थितीत राहावे यासाठी बर्फ विकत आणून शीतगृहात ठेवावा लागल्याचे काही बेकरी चालकाने सांगितले. उन्हाळ्यात आईस्क्रीमलाही अधिक मागणी असते. मात्र, सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने आइस्क्रीमचेही नुकसान झाल्याचे मिठाई दुकानदारांनी सांगितले. त्याचप्रमाणे उन्हामुळे उसाचा रस पिण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. त्यामुळे जनरेटरद्वारे उसाचा रस काढावा लागला असल्याचे एका रसवंतीगृह चालकाने सांगितले.

पाणीही भरता आले नाही
भोसरी गावठाण, सम्राट अशोकनगर शांतिनगर आदी भागाचा शनिवारी पाण्याचा दिवस होता. मात्र, शनिवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने इमारतीवरील टाकीवर पाणी सोडता आले नाही. ऐन सणात पाणी नसल्याने आणि दुसऱ्या दिवशीही पाणी येणार नसल्याने समस्या वाढली असल्याचा संताप सुलक्षणा गायकवाड यांनी व्यक्त केला. भोसरीतील सहल केंद्राजवळील फीडर क्रमांक ११मध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा पुरवठा खंडित झाल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. ही केबल सहल केंद्राच्या भिंतीखालून जात असल्याने भिंत न खोदता नवीन केबल टाकण्याचा निर्णयही घेतल्याचे सांगण्यात आले.

भोसरीतील गंगोत्री पार्क परिसरामध्ये शुक्रवारपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. आज अक्षय तृतीयेच्या सणालाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सणाचा स्वयंपाक करताना अडचणीला सामोरे जावे लागले.
- पूजा शेलार, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT