पिंपरी-चिंचवड

विवाह जमविण्यासाठी तडजोड महत्त्वाची माजी आमदार विलास लांडे यांची अपेक्षा

CD

भोसरी, ता. १८ : सध्याच्या काळात मुला-मुलींसाठी त्या-त्या क्षेत्रातील वधू-वर शोधणे कठीण काम झाले आहे. उच्चशिक्षित मुलींची संख्या समाजात जास्त असून त्यांच्या वराबाबतच्या अपेक्षाही अवास्तव वाढत आहेत. विवाह जमविण्यासाठी तडजोड ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे मत माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरीत नुकतेच व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहर तेली समाजाच्यावतीने आयोजित वधु-वर पालक परिचय मेळाव्याच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाघोली गावच्या सरपंच वसुंधरा उबाळे होत्या. यावेळी संताजी महाराज जगनाडे तेली समाज संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, सचिन लांडगे, विशालमहाराज फुगे, पिंपरी-चिंचवड शहर तेली समाजाचे अध्यक्ष शिवराज शेलार आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात आठशे वर आणि साडेतीनशे वधूंनी नावनोंदणी केली. समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिवदास उबाळे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप खोंड, बंडोपंत शेलार, विजयकुमार शिंदे, संतोष माकुडे, संदीप चिलेकर, प्रदीप बारमुख, रमेश भोज, घनश्याम वाळुंजकर, अनिल चौधरी आदींनी परिश्रम घेतले. संस्थेचे मुख्य सचिव संजय जगनाडे यांनी प्रास्ताविक केले. मनीषा काळे यांनी आभार मानले.


फोटोः 02500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Horoscope : उद्या 15 मार्चचा दिवस घेऊन येणार पैसाच पैसा; गजलक्ष्मी योगाने 4 राशींचे नशीब उघडणार, मोठे संकट दूर होणार

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

SCROLL FOR NEXT