पिंपरी-चिंचवड

चेंबरची झाकणे किती वेळा बदलणार?

CD

भोसरी, ता. ११ : भोसरीतील काही रस्त्यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने सिमेंट काँक्रीटीकरण केले आहे. मात्र, त्यावरील गटार आणि पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरची झाकणे वारंवार तुटत आहेत. एकच झाकण चार वेळा बदलूनही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेने भोसरीतील भोसरी गावठाण परिसर, गव्हाणेवस्ती, आदिनाथनगर, छत्रपती संभाजीनगरातील कै. सखुबाई गवळी उद्यानालगतचा रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. मात्र, चेंबरच्या बांधणीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे काही चेंबरजवळील सिमेंट नाहीसे होऊन खड्डे पडले आहेत. तर, काही भागातील चेंबर झाकणांची पातळी खाली-वर झाली आहे. त्यामुळे वाहन चालाकांना कसरत करत जावे लागत आहे.
लांडेवाडी चौक ते पीसीएमसी चौक रस्त्यावर चेंबरची अधिक दुरवस्था दिसते. वाहनांमुळे चेंबर वारंवार खचत आहेत. चेंबरच्या झाकणाचे सिमेंट गळून लोखंडी गज बाहेर आले आहेत. ही झाकणे महापालिकेने आतापर्यंत तीन ते चार वेळा बदलली आहेत. मात्र, एका आठवड्यातच ती तुटत आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

वाहन चालकांचा प्रवास खडतरच
रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने बसवलेले कॉबलर स्टोन आणि पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत. त्यातच नादुरुस्त चेंबरची भर पडल्याने सिमेंटच्या रस्त्यावरूनही वाहन चालकांचा प्रवास खडतरच झाला आहे.

या रस्त्यावरील चेंबरची दुरावस्था
पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, लांडेवाडी चौक ते चांदणी चौक, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, कै. सखुबाई गवळी उद्यान ते दिघी रस्ता, गवळीनगर अंतर्गत रस्ते, जयदीप पार्कजवळून संत तुकाराम मंदिर रस्त्याला जोडणारा रस्ता, खंडोबामाळ रस्ता, चक्रपाणी वसाहत अंतर्गत रस्ते.

लांडेवाडीतील रस्त्यावरील चेंबरची पाहणी केली जाणार आहे. नादुरुस्त चेंबरची दुरुस्ती करण्यात येणार आहे. चेंबर तुटण्याच्या कारणांचा शोधही घेतला जाणार आहे.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय.

ठेकेदाराने रस्त्याची कामे अर्धवट केली आहेत. लांडेवाडीत निकृष्ट चेंबर बसवले आहेत. बस किंवा जड वाहने वरून गेल्यास चेंबर खचत आहेत. त्यावरील सिमेंटही गळून पडत आहे. त्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
- नीलेश लांडगे, ग्रामस्थ, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT