पिंपरी-चिंचवड

जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥

CD

भोसरी, ता. २० ः अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥
जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ या अभंगाप्रमाणे पावसाची तमा न बाळगता टाळ, मृदंगाच्या गजरात पांडुरंगाच्या भेटीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत निघालेल्या वारकऱ्यांचे दिघीत शुक्रवारी (ता.२०) सकाळी अकरा वाजता भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सकाळी अकरा वाजता मॅगझीन चौकात आगमन झाले. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजय खोराटे उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सचिन पवार, सिताराम बहुरे, सहशहर अभियंता बापुसाहेब गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदींच्या हस्ते दिंडी प्रमुखांचे प्रथमोपचार कीट, श्रीफळ देऊन आणि हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आवाड आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. यावेळी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि माजी नगरसेवकांसह पदाधिकारी उपस्थित होते.
माउलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली. ज्ञानोबा माउली तुकाराम असा टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंगाच्या भेटीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर पावसाची तमा न करता वारकरी पुढे चालले.
डोई तुळशी वृंदावन व ज्ञानेश्वरी घेत महिला वारकरी सहभागी झाल्या. ‘माउली माउली’ या शब्दांनी पालखीतील अबालवृद्धांना उर्जा मिळाली. पालखी सोहळ्यात ५१ वासुदेवांचा गटही सहभागी झाला. टाळांच्या गजरात वासुदेव संतांची परंपरा सांगत अभंगही गात होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संतपीठातील शिक्षक, शिक्षिकांनी अभंग गात पालखी मार्गावर फेर धरला. महापालिकेद्वारे मॅगझीन चौकात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे काढण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.

ध्वनी प्रदूषण विरहीत सोहळा
दरवर्षी पालखी मार्गावर दिघीतील मॅगझीन चौकात विविध सामजिक संघटनांसह राजकीय पक्षांद्वारे उभारलेल्या स्वागत मंडपात ध्ननीक्षेपकांद्वारे वारकरी आणि दिंडीच्या स्वागताबरोबरच पक्षांच्या नेत्यांची नावे मोठमोठ्याने पुकारली जात. सर्वच ठिकाणांहून मोठ-मोठ्या कर्णाद्वारे पुकारा होत असल्याने चौकात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असे. मात्र, यावर्षी महापालिकेने स्वागत मंडपात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई केली होती. त्याचप्रमाणे महापालिकेच्या स्वागत कक्ष आणि पोलिसांच्या टेहळणी कक्षावर एकच कर्ण लावला असल्याने यावर्षीची वारी ध्वनीप्रदूषण विरहीत झाली.

PNE25V24440, PNE25V24441

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल! 'ही' लोकप्रिय गाणी वापरून 'Instagram Reels' वर होईल लाइक्सचा वर्षाव

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

SCROLL FOR NEXT