भोसरी, ता. २ ः टाळ - मृदंगाच्या गजरात मुखी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर...हाती भगव्या पताका... वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी...आणि ‘एक रुक्मिणी, एक विठ्ठल - एक वृक्ष, एक मित्र’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढत नागरिकांत जनजागृती केली. भोसरी गावठाणामध्येही माउलींच्या पादुकांची दिंडी काढण्यात आली.
भोसरीतील दिघी रस्त्यावरील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वरील दिंडी काढली. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिकात्मक पालखी सजवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर, अभंग गायन तसेच पर्यावरण जनजागृतीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन समाज प्रबोधनही केले. प्रियांका बागल, वैशाली खानझोडे यांनी संयोजन केले. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक रुक्मिणी कोळी, ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय शिंदे, पल्लवी शिंगोटे, सुषमा गांजुरे, अभय धराडे, वर्षा जाधव आदींसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
गोल रिंगणासह फुगडी
महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्या मंदिरातील मुलांची शाळा क्रमांक तीन व चार, कन्या शाळा एक व दोन आदी शाळेतील विद्यार्थ्यांनीही भोसरी गावठाण परिसरातून विठ्ठल-रुक्मिणी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुकांची दिंडी काढली. यावेळी वारकऱ्यांच्या वेशात विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी गोल रिंगणासह फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला. मुख्याध्यापिका आशा व्यवहारे, संगीता चटणे, पुष्पा शिंदे आणि नूतन फुलसुंदर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पूनम नातू, जयश्री लांडे, प्रिया खुटवड, वर्षा हडवळे यांच्यासह सर्व शाळेतील शिक्षक वृंदांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
BHS25B03066
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.