पिंपरी-चिंचवड

आळंदी रस्त्यावरील खड्ड्याने दुचाकीचालकांना अपघाताचा धोका

CD

भोसरी, ता. ९ : आळंदी रस्त्यावर भारत पेट्रोलियमजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा खड्डा तातडीने भरण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांमधून होत आहे.
भोसरीतील आळंदी रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर भारत पेट्रोलियमजवळ पावसाळी गटाराजवळ मोठा खड्डा पडला आहे. पावसाळी गटारीच्या चेंबरची पातळी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच आहे. त्याच्याजवळच रस्त्यावर मोठा खड्डाही पडला आहे. त्यामुळे वाहने चेंबरवरून सरळ या खड्ड्यात जाऊन आदळत आहेत. रात्रीच्यावेळेस या खड्ड्यांमध्ये दुचाकी पडून वाहन चालकांना दुखापत झाल्याचे काही वाहन चालकांनी सांगितले. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहते असल्याने वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातही होत आहेत. रस्त्यावरच असलेल्या खड्ड्यामुळे वाहनांची गती कमी होत असल्याकारणाने रस्त्यावरील वाहतूक कोंडीसही हा खड्डा कारणीभूत ठरत आहे. या खड्ड्यासह आळंदी रस्त्यावर इतर काही ठिकाणीही खड्डे पडले आहेत.


BHS25B03092

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake in Delhi: तब्बल १० सेकंद राजधानी हालली...दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के

Indian Womens Hockey: अनुभवी हॉकी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे घसरण : हरेंद्र सिंग

Horoscope Prediction Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला गजकेसरी अन् मालव्य राजयोग, मिथुनसह या राशींना धनलाभ आणि सुखाची प्राप्ती!

Stock Market Opening: सेन्सेक्सची 122 अंकांच्या वाढीसह सुरुवात; मेटल क्षेत्रात तेजी, कोणते शेअर्स घसरले?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

SCROLL FOR NEXT