ENG vs IND 3rd Test: भारत-इंग्लंड आघाडी घेण्यासाठी लढणार, पण पाऊस आणणार अडथळा? जाणून घ्या हवामान अंदाज
England vs India 3rd Test Weather Updates: भारत आणि इंग्लंड संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर आमने-सामने असणार आहेत. या सामन्यावेळी पाऊस अडथळा आणणार का? जाणून घ्या काय आहेत अंदाज
अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी या भारत - इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून (१० जुलै) सुरू होत आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स क्रिकेट मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे.