भोसरी, ता. १३ ः इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील इमारत क्रमांक ५४ जवळ पिंपरी चिंचवड महापालिकेने चुकीच्या पद्धतीने बांधलेला सिमेंटचा गतिरोधक अखेर काढला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
या गतिरोधकाची दुरवस्था झाल्याने तेथे खड्डे पडले होते. त्याने दुचाकी चालक घसरून जखमी होण्याचे तसेच चारचाकी वाहनांचा खालचा भाग गतिरोधकास घासून त्यांचे नुकसान होत होते. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेने तत्काळ त्याची दखल घेत हा गतिरोधक काढून टाकला.