पिंपरी-चिंचवड

आठवते मज शाळा ! दाटला कंठ, उचंबळल्या भावना...

CD

भोसरी, ता. ३० ः रोजचा गृहपाठ, मैदानावरचे खेळ, मित्रांसमवेतच्या केलेल्या गंमती-जमती, मित्रांसोबत खालेल्ला डबा, शिक्षकांनी दिलेला मार, ज्ञानाच्या शिदोरीबरोबरच मिळालेले संस्कार हे सगळं आठवून श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेचे माजी विद्यार्थी भावूक झाले. आपल्या शाळेची घंटा आता पुन्हा परत कधीही ऐकू येणार नाही, या भावनेने त्यांना गहिवरून आले.
भोसरीतील पीएमटी चौकात पिंपरी चिंचवड महापालिकेची सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळा होती. या इमारतीत कन्या शाळा क्रमांक दोन आणि मुलांची शाळा क्रमांक चार भरत होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी महापालिकेने शाळेची इमारत धोकादायक घोषित केली होती. गावठाणातील नवीन इमारतीत जून २०२५ मध्ये शाळा स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने शाळेची इमारत पाडण्यास नुकतीच सुरुवात केली. मात्र, ज्या शाळेने शिक्षण दिले...संस्कार दिले...ज्या वर्गाने एकेकाळी किलबिलाट गोंधळ ऐकला...ती शाळा पाडताना पाहून शाळेचे माजी विद्यार्थी भावूक झाले. शाळेचे माजी विद्यार्थी सुनील बाळासाहेब लांडगे, अजित गोडसे, संतोष देवकर, अशोक जाधव आदींनी शाळेला भेट दिली.

पोकलेन मशीनद्वारे मी शाळा पाडण्याचे काम करत आहे. ज्या शाळेत शिकलो. तीच शाळा पाडताना व पडताना बघून दु:ख होत आहे. शाळा पाडण्यापूर्वी शाळेतून फेरफटका मारला. काही वेळ पुन्हा विद्यार्थी दशेत रंगलो.
- राजेश राक्षे, माजी विद्यार्थी, व्यावसायिक

शाळेची इमारत पडताना बघून दु:ख होत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेने इथे नवीन शाळा बांधताना सध्या दहावीपर्यंत असलेली शाळा बारावीपर्यंत केल्यास विद्यार्थ्यांची अधिक सोय होईल.
- भानुदास फुगे, माजी विद्यार्थी उपाध्यक्ष, हभप समस्त भोसरीगाव ट्रस्ट

श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेशी जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते. माझ्यासाठी ही शाळा म्हणजे घरच होते. ही शाळा पाडली जात असल्याचे दु:ख आहे.
- आशा व्यवहारे, मुख्याध्यापिका, मुलांची शाळा क्रमांक ४

भोसरीतील महापालिका शाळेच्या इमारतीचे २०२२ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. त्यावेळी ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. आता ही इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे.
- शैलेंद्र चव्हाण, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), इ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT