पिंपरी-चिंचवड

आदिवासींच्या सवलती संपुष्टात येण्याची भीती

CD

भोसरी, ता. १७ : ‘‘आदिवासी समाजाच्या सवलती संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन सामाजिक ऐक्य ठेवण्याची गरज आहे’’, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामदास डामसे यांनी केले.
आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती, पिंपरी चिंचवड व पुणे विभाग यांच्यावतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात डॉ. डामसे हे बोलत होते. यावेळी आदिवासी अभ्यासक प्रा. डॉ. सोनू लांडे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. अरुण साबळे, सुरेखा भालचिम, आरोग्याधिकारी वनिता डोळस, उपअभियंता शिवाजी चौरे, विठ्ठल कोथिरे, माजी महापौर शकुंतला धराडे, समितीचे अध्यक्ष आनंद भवारी, उपाध्यक्ष सखाराम गवारी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, आशा सुपे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी, भोसरीतील लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत आदिवासी पुरुष, महिला पारंपरिक वेशभूषेत आणि बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल, राणी दुर्गावती अशा अनेक क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील उडदावणे नृत्य पथक आणि वनदेव, गोपनृत, कोंडरे (ता. आंबेगाव) येथील पथकाने आपल्या शैलीतून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पिंपरीतील नेहरूनगरातील पद्मश्री वसंतदादा प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी गाण्यावर नृत्य सादर केले. महिलांनी आदिवासी नृत्य व गाणी, भाषणे, आदिम प्रबोधन पथक, बोपखेल यांनी ‘वंदन करतो आदिवासी’ हे गीत सादर केले. प्रास्ताविक आनंद भवारी यांनी केले. सुरेखा लेंभे, ढवळा ढेंगळे, जयमाला मराडे, संगीता लांडे आदींनी सूत्रसंचालन केले. सखाराम गवारी यांनी आभार मानले.
BHS25B03175

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT