पिंपरी-चिंचवड

ओळख उपनगराची चिखली गाव

CD

चिखलीला धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय वारसा

वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थस्थान देहू व आळंदी. त्यांच्या मधोमध चिखलीगाव वसले आहे. संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठाला जाताना आपले टाळ चिखली गावात टाकले होते, त्यावरूनच गावाला ‘टाळगाव चिखली’ असे संबोधले जात आहे. त्या घटनेचे साक्षीदार असलेले टाळ मंदिर आजही गावात आहे. तसेच महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी चिखली गावातील होते. इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या गावाला चोहोबाजूने तटबंदी होती. ग्वाल्हेरचे देवराम कृष्णराव जाधवराव यांची गढी आहे. त्यामुळे गावाला धार्मिक, ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभला आहे.
- अनंत काकडे

चि खलीगाव, जाधववाडी, कुदळवाडी, मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती, पवार वस्ती, हरगुडे वस्ती या संपूर्ण भागाचा गावात समावेश आहे, पूर्वी बहुतांशी शेतीवर उपजीविका असलेल्या या गावाचा १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश केला. बजाज, टाटा मोटर्स, फोर्स मोटर्स, थरमॅक्स यांच्यासह भोसरी एमआयडीसीतील मोठ्या कंपन्या जवळपास आहेत. त्यांच्यावर आधारित स्पेअर पार्ट तयार करण्याचे लघुउद्योग कुदळवाडी, चिखली परिसरात आले. आज सुमारे दोन हजार लघुउद्योग परिसरात असून अनेकांना रोजगार मिळाला आहे.

रस्त्यांचे जाळे
पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई या दोन महामार्गांना जोडणारा स्पाइन रस्ता चिखली परिसरातून जातो. देहू आणि आळंदी या धार्मिक स्थळांना जोडणारा रस्ताही गावातूनच जातो. तसेच चिखली, आकुर्डी, निगडी व भोसरी यांना जोडणारेही स्वतंत्र रस्ते आहेत.

उद्योगांची भरभराट
चिखली परिसरात पूर्वी शेती हाच मुख्य व्यवसाय होता. मात्र, औद्योगिकरण आणि महापालिकेत समावेश झाल्यामुळे उद्योगधंद्याची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली आहे. अनेक तरुण पुढे येऊन स्वतःचे उद्योग व्यवसाय करू लागले आहेत.

गावपण जपले
यात्रा, उत्सवाबाबतचा गाडा गावकरी मंडळी पारावर बैठक भरवून एकोप्याने हाकत आहेत. भैरवनाथ यात्रा, शिवजयंती व गणपती उत्सवासह अन्य कार्यक्रमांचे निर्णयही एकत्र बसूनच घेतात. ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करतात.

बैलगाडा शौकीन
गावातील बहुतांशी नागरिक बैलगाडा शौकीन आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बैल पाळतात. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. भैरवनाथ यात्रा उत्सव तसेच इतर कार्यक्रमाच्या वेळी घाटावर बैलगाडा शर्यती न चुकता होतात.

महापालिकेचा हातभार
नव्याने विकसित होणाऱ्या परिसराचा नियोजनबद्ध विकास होत आहे. मोरे वस्ती, सोनवणे वस्ती व गावठाणात महापालिकेने शाळा उभारल्या आहेत. सुशोभित कमानीमुळे गावाचे रुप बदलले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे.

ऐतिहासिक संतपीठ
महापालिकेतर्फे चिखलीत संतपीठ उभारले जात आहे. यामुळे धार्मिक वारसा जपण्याला मोठी मदत होईल. सध्या संतपीठाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.

वाढते गृहप्रकल्प
रेडझोन हद्दीमुळे मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती भागाचा नियोजनबद्ध विकास होऊ शकला नाही. मात्र रेडझोन हद्दी बाहेर नियोजनबद्ध विकास होताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत.

घरकूलचा निवारा
महापालिकने आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना हक्काचे घर मिळावे, यासाठी चिखली-प्राधिकरणात घरकुल गृहप्रकल्प साकारला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने हा परिसर विकसित केला असून स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

चिखली गावातील नागरिक पूर्वी तटबंदीत राहत होते. आता वस्त्या वाढल्या आहेत. नवीन पिढी कामधंद्याच्या निमित्ताने बाहेर पडली आहे. तरीही आज गावातील कामाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. गावपण जपले जात आहे.
- विलास साने, चिखली

कामधंद्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात अनेक जण आले आहेत. मीही त्यातीलच एक आहे. येथे रोजगार मिळाल्यामुळे चिखली परिसरात स्थायिक झालो. पोटापाण्याची सोय झाल्याने आता चिखलीला आपलेच गाव मानले आहे.
- गजानन काशीद, मोरेवस्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Updates: बनावट नोकरीच्या जाहिरातींविषयी नागपूर मेट्रोचा इशारा

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

SCROLL FOR NEXT