चिंचवड, ता. ७ : ‘‘ओबीसींना केवळ राजकारणासाठी आरक्षण नको तर केंद्र व राज्य सरकारकडून विशेष निधी मिळावा,’’ अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
महात्मा ज्योतिबा फुले मंडळातर्फे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘ओबीसींनी संघटित होण्याची गरज आहे. इतरांना जे मिळते ते आम्हालाही मिळाले पाहिजे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकारला जागे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’’ कार्यक्रमाला ओबीसी विकास, ऊर्जा मंत्री अतुल सावे, आमदार शंकर जगताप, रूपाली चाकणकर, मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके उपस्थित होते.
भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांवर आधारित संघटित लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश आचरणात आणावा, असेही ते म्हणाले.
अतुल सावे यांनी ओबीसींसाठी ५६ वसतिगृहे व ७२ वसतिगृहे उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. रूपाली चाकणकर (महिला राज्यभूषण), आशाबाई तळेकर (आदर्श माता), मालतीताई भूमकर (आदर्श माता), भाग्यश्री महाराज भाग्यवंत (अध्यात्म भूषण), फातिमा शेख (फातिमा सावित्री पुरस्कार), पूजा डोके (उद्योगभूषण), टिळेकर (आदर्श मुख्याध्यापिका), संध्या स्वामी (संस्कार भूषण), सुवर्णा कदम (समाजभूषण) यांचा पुरस्कारांमध्ये समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन हणमंत माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन महादेव महाराज भुजबळ यांनी केले. आभार सूर्यकांत ताम्हाणे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.