पिंपरी-चिंचवड

गटारांच्या उंच झाकणांमुळे अपघातांचे सत्र

CD

चिंचवड, ता.१९ ः शहरातील चापेकर चौक ते जुना जकात नाका भागामध्ये भूमिगत गटारांच्या झाकणांची उंची रस्त्याच्या तुलनेत जास्त असल्याने वाहन चालकांसाठीच नव्हे; तर पादचाऱ्यांसाठी देखील ती धोकादायक बनली आहेत. दुचाकीस्वार झाकणांवरून घसरून अथवा धडक बसून अपघातग्रस्त होत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला त्वरित उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.
या रस्त्यावर वाहन चालविताना अचानक समोर गटाराचे उंच झाकण आल्यास त्याला वाहने आदळत आहेत अथवा एखाद्या चालकाच्यादृष्टीस ते पडल्यास त्याला चुकवितानाही अपघाताचा धोका निर्माण होत आहे. पदपथावरील किंवा त्यालगतच्या गटारांचीही दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी ती खचली आहेत. तर काही ठिकाणी त्यांच्याभोवती खड्डे पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही चालताना ही गटारे धोकादायक बनली आहेत.

पावसाळ्यांत गंभीर समस्या
पावसाळ्यात दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या समस्या अधिक गंभीर बनते. पावसाचे पाणी झाकणांपर्यंत साचते. त्यामुळे वाहन चालवत असताना चालकाला त्यांचा अंदाज येत नाही. पाण्याबरोबर वाहून आलेला चिखल आणि घाणसुद्धा झाकणांवर जमा होते. अचानक झाकणाच्या उंच भागाला धडक बसून वाहनांचे अपघात होतात. याशिवाय, एखादे वाहन गेले पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. पाण्याबरोबर वाहून आलेला चिखल आणि घाणसुद्धा झाकणांवर जमा होते. अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या समस्येचे कायमस्वरूपी समाधान करण्याची मागणी होत आहे.
स्थानिक रहिवासी गजानन भालेकर म्हणाले, ‘‘ही समस्या दीर्घकाळापासून आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने योग्य उपाय योजना केल्या नाहीत. अनेक दुचाकीस्वार झाकणांवरून घसरून गंभीर जखमी झाले आहेत. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. प्रशासनाने लवकरच योग्य उपाय योजना केल्या तर नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल.’’

उपाय योजना काय ?
- भूमिगत गटारांची झाकणे रस्त्याच्या पातळीला समांतर करणे
- योग्य उंचीवर झाकणे आणल्यास अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट
- पावसाळी गटारांची वेळोवेळी योग्य देखभाल दुरुस्ती करणे
- पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नियमित साफसफाई आवश्यक
- गटाराच्या उंच झाकणांच्या ठिकाणी सावधगिरीचे इशारा फलक लावणे

चापेकर चौक ते जुना जकात नाका परिसरात साधारणपणे १५ ते २० गटारे आहेत. सिमेंट रस्त्याच्यावेळेस जुने गटारे असतील; तर त्या सर्व सर्व गटारांची पाहणी करून लवकरच दुरुस्ती केली जाईल.
- चेतन देसले, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT