चिंचवड, ता. १० ः उन्हाळी सुट्टीत गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी गडहिंग्लज आगार व्यवस्थापक गुरुनाथ रेणे यांच्या सहकार्याने निगडी-गडहिंग्लज मार्गावर सकाळ व संध्याकाळ अशा चार विशेष एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी बसची पूजा करून रात्री ९ वाजता निगडीहून नेसरीकडे बस रवाना करण्यात आली. या वेळी गडहिंग्लज आगाराचे दोन चालक अर्जुन खवरे,जयेश पाटील, वाहक अनिल लोटे, निगडी नियंत्रक चेतना कोळी, अर्जुन सावंत, सुशांत कळवीटकर हे उपस्थित होते. गडहिंग्लज ते निगडी स.९.३० व रात्री ८.३०, निगडी ते गडहिंग्लज स. ७.३०, निगडी ते नेसरी रात्री ९ अशा बसच्या वेळा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.