चिंचवड, ता. २३ : मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर, परशुराम नगर, शंकरनगर, आनंदनगर, साईबाबानगर व इंदिरानगर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांना निवेदन दिले. ‘‘परिसरात दररोज वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात तासन्तास वीज गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ’’ असे भापकर यांनी म्हटले आहे. या परिसरात जादा क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, नवीन फीडर बॉक्स, जुनी वाहिनी बदलणे, कर्मचारी व वाहनांची संख्या वाढवणे या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडले जाईल,’’ असे भापकर यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.