चिंचवड, ता.२५ ः चिंचवडमधील इंदिरानगर येथील शिवलिंग नंदी मंदिर हनुमान ट्रस्ट यांच्यावतीने शनिवारी (ता.२४) वैशाख कृष्ण द्वादशीनिमित्त महादेवास चंदन उटी सोहळा व मोगरा महोत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा झाला. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
या प्रसंगी मंदिरात सकाळी नित्य अभिषेक झाल्यानंतर भगवान महादेव व नंदी महाराज यांना शुद्धतेचे प्रतीक असलेल्या चंदन उटीने लेपण करण्यात आले. तसेच पिंडीला बेलाची पाने, मोगरा फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली. त्याचबरोबर सर्व मंदिरामध्ये मोगऱ्याच्या माळांनी सजावट करण्यात आली. मंदिरातील इतर शनी देव व हनुमान मूर्तींना देखील चंदनाने अभिषेक करून लेपण करण्यात आले. तसेच मोगऱ्यासह इतर फुलांनी सजावट करण्यात आली. त्यामुळे मोगऱ्याचा दरवळ, चंदनाचा गारवा आणि भक्तीचा सागर यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुगंधित आणि मंगलमय झाला. सायंकाळी ७.३० वाजता नित्य आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. यावेळी परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यानिमित्त सायंकाळी ७ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत जय शंकर भजनी मंडळातर्फे अखंड जागर भजन सेवा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवलिंग नंदी हनुमान ट्रस्ट तसेच जय शंकर भजनी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.