पिंपरी-चिंचवड

दीक्षा आज्ञापन समर्पण सोहळा चिंचवडगावामध्ये उत्साहात

CD

चिंचवड, ता.११ ः श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, कल्याण प्रतिष्ठान, चिंचवडगाव यांच्यावतीने दीक्षा आज्ञापन समर्पण सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात दीक्षार्थी कु. हर्षा शैलेश पारख हिने संयम जीवनाकडे वाटचाल करण्याचा संकल्प जाहीर केला.
उपाध्याय प्रवर प्रवीण्य ऋषीजी, तीर्थेश ऋषीजी, साध्वी डॉ. प्रणवदर्शना व साध्वी ईशदर्शना यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी प्रवीण्य ऋषीजींनी प्रवचनात संयम जीवनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,‘‘आई-वडिलांची संमती आणि श्री संघाच्या अनुमोदनाशिवाय दीक्षा घेणे योग्य नाही.’’
यावेळी कु.हर्षा पारख हिचे वडील शैलेश पारख, आई तसेच श्री संघाचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करून आपली संमती जाहीर केली. संगमनेर येथील पुढील वर्षी होणाऱ्या सोहळ्यात दीक्षा घेणार आहे. या प्रसंगी श्री संघाचे अध्यक्ष अशोक बागमार, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे डॉ.अशोक पगारिया, पंचम झोनचे नितीन बेदमुथा, संगमनेर श्री संघाचे अध्यक्ष दर्डा, अमोलकचंद पारख, राजेंद्र जैन, विलास पगारीक, राजेंद्र मुनोत, सागर सांकला, पी.एम.जैन (ज्ञानप्रकाश योजना), संतोष कटारिया, सुभाष ललवानी, सुरेश सेठिया (कल्याण प्रतिष्ठान), महिला अध्यक्ष सुनीता गुगळे,सुनीता मुथा आदी उपस्थित होते. मिरवणुका, गीतांच्या सादरीकरणाने व समाज बांधवांच्या मोठ्या सहभागाने हा दीक्षा आज्ञापन सोहळा संस्मरणीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT