चिंचवड, ता. ११ : श्री धनेश्वर विश्वास मंडळ, प्राचीन शिवालय धनेश्वर यांच्यावतीने आयोजित देहू - पंढरपूर पायी दिंडी नुकतीच चिंचवडमध्ये दाखल झाली. दिंडीमध्ये ७० महिला आणि ५५ पुरुष वारकरी सहभागी झाले. ही वारी २२ वर्षांपूर्वी बुवा गावडे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. कैलास साठे, शिरीश शोले, बालाजी दळवी, मनोज सुतार, युवराज मोहोळ आणि नानी चिंचवडे यांच्या पुढाकारातून स्वयंपाक व सर्व व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. योगेश चिंचवडे यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला होता. आवेश चिंचवडे आणि विजय गावडे मित्र मंडळाच्या पुढाकारातून पंढरपुरात वारकऱ्यांच्या निवासाची सुविधा करण्यात आली.