पिंपरी-चिंचवड

रस्टन कॉलनीसमोरील पदपथाच्या दुरुस्तीचा विसर

CD

चिंचवड, ता.१३ ः गेल्या महिनाभरापासून बिजलीनगर ते चिंचवडगाव मुख्य मार्गावर रस्टन कॉलनीसमोरील रस्ता व पदपथ खोदलेल्या अवस्थेतच आहे. केबलच्या कामासाठी खोदाई केल्यावर रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रस्ता व पदपथावर पडलेले मोठमोठे दगड, खोदकामानंतर उघड्या अवस्थेत राहिलेले नाले यामुळे पादचाऱ्यांसाठी हा मार्ग धोकादायक बनलेला आहे. संध्याकाळी किंवा गर्दीच्या वेळेस नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नसल्यामुळे त्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. वाहने भरधाव वेगात धावत असतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्टन कॉलनी व चिंचवडेनगर परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संबंधित विभागाने हे खोदकाम तत्काळ दुरुस्त करून रस्ता व पदपथ पुन्हा चालण्यायोग्य करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
CWD25A01574

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT