पिंपरी-चिंचवड

रातोरात तयार केलेला रस्ता महिनाभरात उखडला

CD

चिंचवड, ता. १० : मोरया चौकातील बसस्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था पुन्हा बिकट झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्यात अवघ्या एका रात्रीत या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पण, तो महिनाभरात पुन्हा पूर्वीसारखा झाला आहे. हे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देत नाराजी व्यक्त केली.
मोरया बसस्थानकासमोर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना संतुलन राखणे कठीण झाले आहे. दररोज या मार्गावरून पीएमपी बस, शाळकरी मुलांची वाहने यासह हजारो वाहनांची वर्दळ असते. रस्ता खचल्याने तसेच खड्ड्यांमुळे अचानक धक्के बसतात. ‘‘रस्ता दुरुस्तीवेळी डांबराचे प्रमाण अत्यल्प वापरले गेले. त्यामुळे तो लवकरच उखडला असावा. तक्रारी करूनही महापालिकेकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम केले जाते.काही दिवसांतच ते पुन्हा उखडतात,’’ असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कामाची खडी, माती अजूनही झाडांमध्ये तशीच पडून आहे. ती देखील रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरत आहेत.

दर्जेदार रस्ते तयार व्हावेत
‘‘चांगले रस्ते खोदून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येते, यामुळे सार्वजनिक पैशांची नासाडी होत आहे. वारंवार या ठिकाणी कधी ब्लॉक बसवले जातात, तर कधी डांबराचे रस्ते केले जातात. प्रशासनाने मोरया बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे तातडीने दर्जेदार डांबरीकरण करावे,’’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोरया बसस्थानक परिसरामध्ये डांबरीकरण केले, पण त्यावेळी पाऊस होता. त्यामुळे रस्ता पुन्हा उखडला. सध्या आम्ही तेथील खड्डे बुजवले आहेत. पावसामुळे या वर्षी सर्व ठिकाणी नुकसान झाले आहे. डांबराचे प्लांटही सध्या बंद आहेत. त्यामुळे पाऊस उघडताच दर्जेदार डांबरीकरण करून रस्ता तयार केला जाईल.
- किरण अंदुरे, स्थापत्य उप अभियंता, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT