चिंचवड, ता. २५ : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ-१ स्तरावरील शांतता समितीची बैठक चिंचवड पोलिस ठाण्यात पार पडली. पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखालील बैठकीत कायदा व सुव्यवस्था, मिरवणुकीचे नियोजन आणि गर्दी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला.
मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणुकीचा मार्ग, गर्दीचे नियोजन, पिण्याचे पाणी, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच तात्पुरत्या शौचालयांसह आवश्यक सुविधांची तयारी याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर टाळून धार्मिक व शांततापूर्ण वातावरण कायम ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मनीषा कदम, प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, महेश बनसोडे, रुपाली बोबडे, सुहास आव्हाड आदी अधिकारी तसेच परिमंडळ-१ अंतर्गत विविध समाजांचे शांतता समिती सदस्य उपस्थित होते. सदस्यांनी विविध अडचणी व सूचना मांडल्या. चिंचवड शांतता समितीचे सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी पोलिसांच्या नियोजनाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.